रोहितला मैदान सोडावं लागलं तर...
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी उपकर्णधार जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे बीसीसीआयवर टीका देखील करण्यात येत होती.
माध्यमांमधून समोर वृत्तानुसार रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
रोहित शर्माला जर काही कारणास्तव मैदान सोडावं लागलं तर कोण टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असेल यावर चर्चा केली जातीये.
रोहितला दुखापत झाली किंवा तो काही कारणास्तव मैदानात नसेल तर त्याच्या जागी आर आश्विन उपकर्णधार म्हणून सामना सांभाळू शकतो.
रोहित जर मैदानात गैरहजर राहिला तर अनुभवी चेतेश्वर पुजारा यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाऊ शकते.
विराट कोहली याने संघाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे त्याला उपकर्णधारपद देणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
अजिंक्य रहाणे याने रोहितच्या अनुपस्थितीत संघाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यामुळे त्याच्याकडे देखील आशेने पाहिलं जातंय.