सेहवाग-नेहरा अन् 'या' तीन नावांची चर्चा!
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे.
राहुल द्रविड यांच्या नेतृत्वखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केल्याचं पहायला मिळालंय. मात्र, आता त्यांना टाटा गुड बाय बोलण्याची वेळ आली आहे.
राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी 5 प्रबळ दावेदार आहेत.
आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिष नेहरा याची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागू शकते. गुजरात टायटन्सला आयपीएल जिंकवण्यात त्याचा मोठा वाटा होता.
न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू स्टीफन प्लेमिंग देखील मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जला मार्गदर्शन करण्याचं काम केलंय.
सनरायझर्स हैदराबादचे कोच आणि ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू टॉम मूडी देखील या रेसमध्ये आहेत.
क्रिकेटला ज्यामुळे वेगळं स्वरूप प्राप्त झालं, अशा विरेंद्र सेहवागकडे टीम इंडियाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदासाठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.