मोहम्मद शमीने घेतला होता शिक्षण सोडण्याचा निर्णय; शेतकरी वडील एका वाक्यात म्हणाले होते...
Nov 17,2023
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी सध्या आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे चर्चेत आहे.
शमीने सेमी-फायनल सामन्यात 7 विकेट घेत नवा रेकॉर्ड रचला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात त्याची चर्चा सुरु आहे.
शमीने 2013 मध्ये पाकिस्तानविरोधात आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 100 हून अधिक विकेट घेतले आहेत.
मोहम्मद शमी उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्याच्या सहसपूर येथील आहे. त्याचे वडील शेतकरी आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी त्याने क्रिकेट अकॅडमीत जाणं सुरु केलं होतं.
शमीने उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील आमीर हसन खान पीजी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पण त्याने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.
मोहम्मद शमीने क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी 10 वी नंतर शाळेत जाणं सोडलं होतं. शमीच्या वडिलांनी त्याच्या या निर्णयाचं समर्थन केलं होतं.
शमीला भारतीय संघाचा भाग झाल्याचं आपल्याला पाहायचं आहे असं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं.
मोहम्मद शमीच्या गावात फक्त 8 तास वीज असते. आई-वडिलांना क्रिकेट सामना पाहता यावा यासाठी त्याने घरी जनरेटर आणि इन्व्हर्टर लावला आहे.
मोहम्मद शमीच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं लग्न हसीन जहाँशी झालं होतं. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.