किती स्कोअर केल्यास वर्ल्डकपचे सामने जिंकता येतील? द्रविडने थेट आकडाच सांगितला

Swapnil Ghangale
Oct 08,2023

दमदार सामने, मोठे स्कोअर्स

वर्ल्डकपच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिले चारही सामने मोठ्या स्कोअर्ससहीत अगदीच दमदार झालेत. अगदी पहिल्या सामन्यापासून हे पाहायला मिळत आहे.

सर्वाधिक धावांचा विक्रम

दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका सामन्यामध्ये दोन्ही संघांनी मिळून वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला गेला. दक्षिण आफ्रिकेने 102 धावांनी हा सामना जिंकला

428 धावांचा डोंगर

दक्षिण आफ्रिकेने तब्बल 428 धावांचा डोंगर उभा केला.

326 धावांपर्यंत मजल

श्रीलंकेनेही सर्व ताकद पणाला लावत 326 धावांपर्यंत मजल मारली.

उत्तम आणि सुरक्षित स्कोअर किती?

या सामन्याच्या एकदिवस आधीच भारताचे प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड यांना या स्पर्धेमध्ये उत्तम आणि सुरक्षित स्कोअर किती? असा प्रश्न विचारण्यात आलेला.

हसत दिलं उत्तर

या प्रश्नाला द्रविडने फारच रंजक असं उत्तर दिलं होतं. राहुल द्रविडने या प्रश्नाला हसत हसत उत्तर देताना आपलं मत मांडलेलं.

...तरी चालेल

"विरोधकांपेक्षा केवळ एक धाव जास्त असेल तरी चालेल," असं सर्वोत्तम स्कोअरबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देत राहुल द्रविड हसला होता.

स्पर्धेचं सौंदर्य

"हे पाहा (सुरक्षित धावसंख्या किती असेल) हे सांगणं फार कठीण आहे. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये वेगळ्या गोष्टी घडतात. मला वाटतं हेच या विश्वचषक स्पर्धेचं सौंदर्य आहे. असं मला वाटतं," असंही राहुल द्रविडने म्हटलं.

प्रत्येक खेळपट्टी वेगळी

"वर्ल्डकपमधील सामने वेगवेगळ्या मैदानांमध्ये खेळवले जाणार आहेत. प्रत्येक मैदानातील खेळपट्टी वेगळी आहे," असंही द्रविडने नमूद केलं.

मातीमध्येही फरक

"काही मैदानांमध्ये लाल माती आहे, काही ठिकाणी काळी काही ठिकाणी काळी आणि लाल मिक्स माती सापडते," असं द्रविड म्हणाला.

सांगणं कठीण

"त्यामुळेच वर्ल्डकपमधील प्रत्येक मैदान हे वेगळं असणार आहे. त्यामुळे सुरक्षित धावसंख्या काय असेल हे सांगणं कठीण आहे," असं द्रविडने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story