वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने मात दिली आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले.
वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध सलग 8 वा विजय आहे. पाकिस्तानने वनडे वर्ल्ड कपमध्ये कधीच भारताला हरवले नाही.
6 सिक्स मारुन रोहित शर्मा पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक सिक्सर मारणारा कॅप्टन ठरला. त्याने आतापर्यंत 17 सिक्स मारले. तर धोनीने पाकिस्तानविरुद्ध 15 सिक्स मारले होते.
रोहितने 86 रन्सची खेळी करुन वर्ल्डकप चेजमध्ये सर्वाधिक रन्स बनवले. रोहित शर्माचे 723 रन्स झाले आहेत. सचिन तेंडुलकरचे 656 रन्स आहेत.
रोहितने रिकी पॉंटींगचा रेकॉर्डही तोडला. टार्गेट गाठताना सर्वाधिक रन्स बनवणारा बॅट्समन ठरला. रोहितचे 586 रन्स झाले. तर पॉंटींगचे 519 रन्स आहेत.
पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजाच्या 100 वनडे विकेट पूर्ण झाल्या. असे करणारा तो सहावा भारतीय ठरला. अनिल कुंबळेच्या नावावर 126 विकेट्सचा रेकॉर्ड आहे.
पाकिस्तानने 36 रन्स करताना शेवटचे 8 विकेट दिले. पाकिस्तानने 2 विकेटवर 155 रन्स बनवले होते. त्यानंतर 191 रन्सवर ते ऑलआऊट झाले. याआधी पाकिस्तानी टिमने अशाप्रकारे वेस्ट इंडिजविरुद्ध 32 रन्स आणि श्रीलंकेविरुद्ध 33 रन्सच्या आत 8 विकेट्स दिल्या आहेत.