आयसीसी विश्वचषकातला अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला गेला. अंतिम सामन्यात सुरक्षेत मोठी चूक झाली होती. स्वत:ला पॅलेस्टाईन समर्थक मानणारा एक तरुण मैदानात घुसला होता.
या तरुणाने पॅलेस्टाईन प्लॅग हातात घेत थेट विराट कोहलीच्या खांद्यावर हात टाकला. त्यानंतर त्या तरुणाला तात्काळ अटक करण्यात आली. पण या प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं
या तरुणाचं नाव वेन जॉनसन असं आहे. तो मूळ ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असून त्याची इंडोनेशियन तर वडील चीनचे नागरिक आहेत. 2020 मध्येही एका आंतरराष्ट्रीय रग्बी सामन्या दरम्यान मैदानात घुसला होता.
2020 मध्ये त्याने महिलांच्या एका सामन्यात सुरक्षा कवच भेदून मैदानात प्रवेश केला. यावेळी त्याच्यावर 500 डॉलरचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात वेन जॉनसनने गेट नंबर एकमधून एन्ट्री केली. यावेळी त्याने टीम इंडियाची जर्सी परिधान केली होती. त्यामुळे तो भारतीय समर्थक असल्याचा सुरक्षा रक्षकांचा समज झाला.
आता वेन जॉनसनसाठी खलिस्थानी संघटनांनी बक्षीस जाहीर केलं आहे. सिख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू यांनी 10 हजार डॉलरचं बक्षीस जाहीर केलंय.
जॉनसनने मैदानात घूसत गाझा आणि पॅलेस्टाईनसंबंधी भारताची भूमिका ऊघड केली आहे, आम्ही त्याच्या सोबत असल्याचं सिख फॉर जस्टिसचं म्हणणं आहे.