भारतीय संघ आयसीसीच्या टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या ओव्हलच्या मैदानावर खेळत आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी कोणत्याही आयसीसी स्पर्धांमधील हा 11 वा फायनल सामना आहे.
या सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र एकही चेंडू न खेळता भारताच्या 2 दिग्गजांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हा सामना खेळण्यासाठी मैदानावर पाऊल ठेवताच रोहित शर्मा आणि विराट कोहलीने एक आगळावेगळा विक्रम स्वत:च्या नावावर करत कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीलाही मागे टाकलं आहे.
रोहित शर्मा कर्णधार म्हणून पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संघाचं नेतृत्व करत आहे.
विराट आणि रोहितसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 चा अंतिम सामना हा आयसीसीच्या स्पर्धांमधील 6 वा अंतिम सामना ठरला आहे.
म्हणजेच सहाव्यांदा विराट आणि रोहित हे दोघे आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसत आहेत.
कर्णधार धोनी आयसीसीच्या 5 स्पर्धांचा अंतिम सामना खेळला आहे. त्यामुळेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या निमित्ताने विराट आणि रोहितने धोनीला याबाबतीत मागे टाकलं.
सर्वाधिक वेळा आयसीसी स्पर्धांचा फायनचा समाना खेळण्याचा विक्रम युवराज सिंहच्या नावावर आहे.
युवराजने आतापर्यंत भारताकडून खेळताना 7 आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.
2013 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच ही युवराजच्या कारकिर्दीमधील शेवटची फायनल ठरली.