Couple Goals... 'या' जोडप्याने देशासाठी जिंकल्यात ICC च्या 11 ट्रॉफी

दोघेही मैदानात बिअर पिताना दिसले

Swapnil Ghangale
Jun 12,2023

ऑस्ट्रेलियाने जेतेपदावर नाव कोरलं

ऑस्ट्रेलियाच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला 209 धावांनी पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे.

मिचेल स्टार्कचाही समावेश

जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचाही समावेश होता.

स्टार्क संघात असताना तिसरा विजय

स्टार्कचा समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने कोणत्याही आयसीसीच्या फायनलमध्ये जिंकण्याची ही तिसरी वेळ ठरली.

त्या संघातही होता स्टार्क

स्टार्क यापूर्वी 2015 च्या वनडे वर्ल्डकप विजेत्या संघात आणि टी-20 वर्ल्डकप (2021) जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघातही होता.

प्रोत्साहन देण्यासाठी पत्नी मैदानात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये नवऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची पत्नी एलिसा हिलीसुद्धा मैदानात उपस्थित होती.

एलिसा हिलीसुद्धा खेळते क्रिकेट

एलिसा हिली ही सुद्धा ऑस्ट्रेलियन वूमन्स टीममध्ये म्हणजेच ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या महिलांच्या राष्ट्रीय संघात खेळते.

6 टी-20 विश्वचषक

एलिसासुद्धा चॅम्पियन संघातील सदस्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या वूमन्स टीमने 6 टी-20 विश्वचषक जिंकले आहेत. या 6 वेळेस संघात एलिसा होती.

2 वेळा ओडीआय वर्ल्डकप

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 वेळा वर्ल्डकप जिंकला तेव्हाही एलिसा संघात होती.

11 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या

म्हणजेच एलिसा आणि मिचेल यांनी जोडपं म्हणून आपल्या राष्ट्रीय संघाला तब्बल 11 आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत.

सर्वोत्तम जोडपं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर या दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हे क्रिकेटमधील आतापर्यंतच सर्वोत्तम जोडपं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

दोघे मैदानात साजरा करत होते आनंद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील विजयानंतर एलिसा आणि मिचेल दोघेही मैदानामध्ये आनंद साजरा करत बिअर पिताना दिसले.

VIEW ALL

Read Next Story