धमाकेदार शतकीय खेळाच्या जोरावर आता ऑरेंज कॅप हॉल्डर झालाय. 9 सामन्यात त्याने 428 धावा केल्या आहेत.
दरम्यान, जयस्वालच्या 124 धावा ही राजस्थानच्या कोणत्याही फलंदाजाची लीगमधील सर्वात मोठी खेळी आहे.
सर्वात तरुण वयात आयपीएल शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यशस्वी जयस्वालने जागा मिळली आहे.
ना कॅमरून ग्रीनला सो़डलं, ना जॉफ्रा आर्चरला... जो बॉलर समोर येईल, त्याला चोपण्याचं काम यशस्वीने केलंय. त्यामुळे आता टीम इंडियाला नवा ओपनर मिळाला, अशी चर्चा होताना दिसते.
अखेरच्या ओव्हरमध्ये यशस्वी बाद झाला. 62 चेंडूत 124 धावा करून यशस्वी राजस्थानला 212 धावांचा टप्पा पार करून दिलाय.
जयस्वालने 53 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं. त्यात त्यानं 13 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. जयस्वालचं हे आयपीएलमधील पहिलं शतक आहे.
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ऐतिहासिक सामना वानखेडे मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात यशस्वी जयस्वालने वादळी खेळी करत शतक ठोकलं आहे.
ऐतिहासिक सामन्यात जयस्वालचं 'यशस्वी' शतक; टीम इंडियाला सापडला नवा ओपनर!