World Cup मधून डावलल्याने चहल दुसऱ्या देशात खेळणार समजल्यावर धनश्रीची Insta Story; म्हणाली...

Sep 08,2023

चहल भारतीय संघातून Out; धनश्रीची सूचक पोस्ट

एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप संघामध्ये भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आलेला नाही. यावर धनश्रीने प्रतिक्रया नोंदवलीय.

चहल या देशातील संघाकडून खेळणार

त्यामुळेच चहलने आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये 3 सामने खेळणार असून त्याने इंग्लिश काऊंटीमधील 'केंट क्रिकेट' संघाशी करार केला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत

ही बातमी समोर आल्यानंतर चहलची पत्नी धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवरुन पतीला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

आधी क्रिकेटमध्ये रस नव्हता पण...

खरं तर धनश्रीला आधी क्रिकेटची आवड नव्हती. मात्र चहलशी लग्न झाल्यानंतर ती सामन्यासाठी मैदानात दिसते तसेच क्रिकेटवर सोशल मीडियावरुन व्यक्त होतानाही दिसते.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये इमोजींचा पाऊस

धनश्रीने या पोस्टमध्ये युजवेंद्र चहलला टॅग करत पृथ्वी, ठेंगा, हार्ट आणि फायर इमोजीही वापरला आहे.

काय म्हणाली धनश्री?

'केंट क्रिकेट' चहलशी करार झाल्याची शेअर केलेली पोस्ट धनश्रीने इन्स्टास्टोरीला ठेवली आहे. "नेहमी आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तू आमचा लेजंड आहेस" असं धनश्रीने म्हटलं आहे.

त्या व्हिडीओत काय

'केंट क्रिकेट'ने शेअर केलेल्या रिलमध्ये चहल किती उत्तम गोलंदाज आहे हे दाखवण्यात आलं आहे.

आयपीएलमधील विकेट्सचे शॉट

'केंट क्रिकेट'च्या व्हिडीओमध्ये चहलने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना घेतलेल्या विकेट्सचे शॉट आहेत.

भारताकडून कसा खेळला हे ही दाखवलं आहे

तसेच चहलने भारताकडून खेळताना कशापद्धतीने फलंदाजांना आपल्या फिरकीत गुंडाळलं हे ही 'केंट क्रिकेट'च्या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.

अनेकदा पतीच्या पाठीशी उभी राहिली

धनश्री ही कायमच अशापद्धतीने चहलच्या पाठीशी उभी राहिल्याचं दिसून आलं आहे. आशिया चषकातून चहलला डावलल्यानंतरही तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती.

VIEW ALL

Read Next Story