यामागेही आहेत खास कारणं

बारीक बारीक काटे असणारे टायर, मध्ये असणारी रीम, त्यात टायरची रुंदी हे सारंकाही असण्यामागेही काही कारणं आहेत.

May 25,2023

टॉप स्पीड

तुम्हाला माहितीये कारच्या टायरवर असणारे आकडेही तितकेच महत्त्वाचे असतात? किंबहुना कारचा टॉप स्पीड हा स्पीडोमीटरवर नसून टायरवरच असतो.

धक्का बसला ना?

धक्का बसला ना? ब्रँडच्या नावासोबतच कार टायरच्या साईड वॉलवर 6 महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आकड्यांच्या रुपात दिलेली असते.

कारची रुंदी

यामध्ये सुरुवातीचा आकडा हा कारची रुंदी दर्शवतो. '/' या चिन्हाच्या आधी असणारा आकडा म्हणजे टायरची रुंदी (MM).

Aspect Ratio

'/' या चिन्हाच्या पुढे असणारा आकडा हा Aspect Ratio असतो. म्हणजेच टायरची रीम आणि पृष्ठ यांच्यात असणारं अंतर.

टायरची बांधणी

या दोन आकड्यांच्या पुढे असणारा शब्द टायरच्या बांधणीबद्दल माहिती देतो. इथं R, B, D असे शब्द असतात.

टायरची रीम

टायरच्या बांधणीच्या शब्दापुढे असणारा आकडा असतो रीमच्या मापाचा. कोणत्या मापाच्या रीमवर टायर बसवण्यात आला आहे हे इथं कळतं.

Load Capacit

त्यालाच लागून असणारा आकडा म्हणजे Load Capacity चा. हा आकडा सहसा 50 ते 122 दरम्यान असून, तो वाहनाच्या प्रकारावर अवलंबून असतो.

लोड कपॅसिटी

लोड कपॅसिटीच्याच पुढे असतं कारचं किंवा त्या वाहनाचं Speed Index. पूर्ण भरलेल्या वाहनासह तुम्ही या टायरनं सर्वाधिक किती वेग गाठू शकता हे इथं स्पष्ट होतं. उदाहरणार्थ W शब्द असल्यास कमाल वेग असेल 270 किमी प्रतीतास.

आहे की नाही कमाल?

टायरच्या निर्मितीची तारीख ही सर्वात शेवटी एका चार आकडी अंकाद्वारे दिलेली असते. आहे की नाही कमाल?

VIEW ALL

Read Next Story