तुमच्या चॅटचा स्क्रीनशॉट कोणी काढला तर लगेच येणार नोटिफिकेशन; आता मोबाईल करा अपडेट

Dec 03,2023

अनेकदा आपल्या काही खासगी चॅट्सचे स्क्रीनशॉट व्हायरल होतात. आपण ज्याच्याशी संभाषण करतो, ती व्यक्ती स्क्रीनशॉट काढून व्हायरल करते.

आता एखाद्याने आपल्या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर कसं समजणार याची चिंता प्रत्येकाला असते.

हे रोखण्यासाठी गुगलने प्रायव्हसी संदर्भातील एक फिचर अँड्रॉइडशी जोडली आहे. पण हे फिचर थेट अँड्रॉइड युजर्सला देण्यात येणार नाही.

गुगल हे फिचर API मध्ये रिलीज करणार आहे, जे अॅप्सला आपल्या प्लॅटफॉर्मवर इंटिग्रेट करावं लागेल. काही अॅपवर हे फिचर आधीपासून आहे.

या फिचरशी जोडल्यानंतर जर एखाद्याने तुमच्या चॅटचा स्क्रीनश़ॉट घेतला तर तुम्हाला तात्काळ नोटिफिकेशन येईल.

हे फिचर इंस्टाग्राम, फेसबुक मेसेंजर आणि स्नॅपचॅट यावर आधीपासूनच आहे. मेसेंजरच्या सीक्रेट चॅटमध्ये हे फिचर मिळतं. इंस्टाग्रामला चॅटमध्ये स्वाइप करुन हे फिचर सुरु केलं जातं.

स्नॅपचॅटमध्ये हे फिचर डिफॉल्ट आहे. Android 14 सह जो API सपोर्ट आहे त्याला कोणतंही अॅप वापरु शकतं.

सध्या अमेरिकेत काही अॅप्सचं टेस्टिंग केलं असून, ते योग्य प्रकारे काम करत आहे. आगामी काळात इतर अॅप्स Android 14 च्या या API ला आपल्या प्लॅटफॉर्मशी इंटिग्रेट करु शकतात.

अॅप इंटिग्रेट केल्यानंतर चॅटिंगदरम्यान जर कोणी स्क्रीनशॉट घेत असेल तर यासाठी एक नोटिफिकेशन युजर्सला पाठवलं जातं.

VIEW ALL

Read Next Story