चक्क रिमोटवर चालणारी इलेक्ट्रिक बाईक लाँच, तब्बल 130 किमी रेंज; किंमत फक्त...

Jun 27,2024

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रोज या सेगमेंटमध्ये नवे मॉडेल लाँच होत असतात.

आता गुरुग्राममधील स्टार्टअप जीटी फोर्सने घऱगुती बाजारपेठेत आपली नवी बाईक GT Texa ला लाँच केलं आहे. लूक आणि डिझाईनमध्ये ती प्रवासी दुचाकीप्रमाणे आहे.

आकर्षक लूक आणि दमदार बॅटरी असणाऱ्या या इलेक्ट्रिक बाईकची किंमत 1 लाख 19 हजार, 555 रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे.

या बाईकमध्ये कंपनीने 3.5kWh क्षमतेची लिथियम-ऑयन बॅटरी पॅक दिला आहे. ही बाईक सिंगल चार्जमध्ये 130 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बाईकची क्षमता 180 किलो असून, बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तासांचा वेळ लागतो.

BLDC मोटर असणारी ही इलेक्ट्रिक बाईक ताशी 80 किमीचा वेग देते. यासह मायक्रो चार्जरही देण्यात आला आहे, जो ऑटो कट फॅसिलिटीसह येतो.

याच्या फ्रंटला 18 इंच आणि मागच्या बाजूला 17 इंचाचं व्हील देण्यात आलं आहे. या बाईकमध्ये पारंपारिक टेलेस्कोपिक फॉर्क आणि ड्युअल शॉक ऑब्जर्व्हर सस्पेंशन मिळतो.

फिचर्सबद्दल बोलायचं गेल्यास यात 7 इंचाचं डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, रिमोट स्टार्ट-स्टॉप, सेंट्रल लॉकिंग, LED हेडलाईट आणि 3 रायडिंग मोड्स दिले आहेत.

जीटी फोर्सकडून लाँच होणारी ही पहिली इलेक्ट्रिक बाईक आहे. याआधी कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे.

VIEW ALL

Read Next Story