WhatsApp वर तुम्हाला कोणी BLOCK केलं आहे कसं समजेल?

Swapnil Ghangale
Jun 25,2024

सर्वाधिक वापरलं जाणारा App

जगभरातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग Application म्हणून व्हॉट्सअपकडे पाहिलं जातं.

अनेक गोष्टी सहज पाठवता येतात

व्हॉट्सअपच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स, पैसे पाठवणं अगदी सहज शक्य आहे.

...तर तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता नाकारता येत नाही

मात्र व्हॉट्सअपवर अनेकदा मेसेज करुनही तुम्हाला समोरची व्यक्ती रिप्लाय करत नसेल तर तिने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

समोरच्या ब्लॉक केलं आहे हेच समजत नाही

अनेकांना तर त्यांना व्हॉट्सअपवर समोरच्या ब्लॉक केलं आहे हेच समजत नाही.

ब्लॉक केलं आहे की नाही?

म्हणूनच आपण इथे काही टीप्स पाहणार आहोत ज्या माध्यमातून व्हॉट्सअपवर एखाद्या आपल्याला ब्लॉक केलं आहे की नाही हे समजू शकतं.

लास्ट सीन दिसत नसेल तर..

तुम्हाला व्हॉट्सअपवर एखाद्या व्यक्तीचं लास्ट सीन दिसत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

डीपी दिसत नसेल तर...

एखाद्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह आहे पण त्याचा व्हॉट्सअप बायो अथवा डीपी दिसत नसेल तर त्याने तुम्हाला ब्लॉक केलं आहे असं समजावं.

स्टेटस दिसत नसेल तर...

व्हॉट्सअपवर तुम्हाला एखाद्याचं नंबर सेव्ह असूनही स्टेटस दिसत नसेल तर तुम्हाला ब्लॉक करण्यात आलं आहे असं समजावं.

VIEW ALL

Read Next Story