कोणी तुमचा कॉल रेकॉर्ड करतंय का? कसं ओळखाल?
हल्ली फोनवर बोलत असताना प्रत्येकजण बराच सावध असल्याचं पाहायला मिळतं. अशा या स्मार्टफोनमध्ये सध्या अगदी सहजपणे वॉईस कॉल रेकॉर्डिंगची सुविधा दिली जाते.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्यांचे फोन रेकॉर्ड करणं गुन्हा आहे. असं करणाऱ्यांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो.
समोरची व्यक्ती तुम्हाला न सांगताच फोन रेकॉर्ड करत असल्यास ही बाबही तुमच्या लक्षात येऊ शकते. फक्त तुम्ही सतर्क असणं गरजेचं.
फोनवर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्हाला मध्येच, बीप असा आवाज ऐकू येईल. याचा अर्थ तुमचा कॉल, तुमचं बोलणं रेकॉर्ड केलं जात आहे.
फोनवर बोलत असताना जर तुमचा फोन जास्त गरम होत असेल, तर याचा अर्थ तुमचा फोन रेकॉर्ड केला जातोय.
फोन करताना अपेक्षेहून जास्त डेटा वापरला जात असल्यासही तुमचा कॉल रेकॉर्ड केला जात असल्याची शक्यता आहे.