अमुक एका व्यक्तीचा आवाज क्लोन करून त्या माध्यमातून लोकांना गंडा घालण्याचं सत्र सध्या स्कॅमर्सनी सुरु केलं आहे.
अशा प्रकारच्या सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये एक बाब लक्षात घ्यावी, की स्कॅमर्स एकच पॅटर्न फॉलो करतात.
स्कॅमर्स सहसा अशा वेळी फोन करतात जेव्हा तुम्ही खूप कामात असता किंवा तुम्हाला फोनची अपेक्षाच नसते. त्यामुळं तुम्हाला असा फोन कॉल आला तर, वेळीच सावध व्हा.
फ्रॉड कॉल्समध्ये तुमच्या बँक खात्यासंदर्भात चर्चा होऊ शकते. त्यामुळं ही संभाषणं टाळा.
एआय वॉईस क्लोनिंग उत्तम झाली असली तरीही ती अजूनही सर्वतोपरी योग्य रितीनं काम करत नाहीये. त्यामुळं फोनचा आवाज रोबोटीक आहे का हे लक्षात घ्या.
अनोळखी फोनकॉल आला, तर तिथं चुकूनही गोपनीय माहिती शेअर करु नका. समोरून स्कॅमरनं कॉल केला असल्यास त्याची रितसर तक्रार करा.