अरे देवा! iPhone 15 लाँच होताच iPhone 13, 12 आणि iPhone 14 Pro बंद
यंदाच्या वर्षीचा बहुप्रतिक्षित इव्हेंट नुकताच पार पडला. अॅपल कंपनीच्या 'वंडरलस्ट' या इवेंटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. कारण, इथं अनेक अफलातून फिचर्स असणारा आयफोन लाँच करण्यात आला.
यंदाच्या वर्षी अॅपलनं आयफोन 15 ची सीरिज लाँच केली. टाईप सी पोर्ट असणारा चार्जिंग पोर्ट देत अॅपलनं एक मोठा निर्णयही घेतला. त्यातच आणखी एका निर्णयाची भरही पडली.
कारण अॅपलनं नव्या सीरिजला लाँच करताच आयफोनचे काही जुने मॉडेल्स भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला.
iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max या नव्या सीरिजची वाट मोकळी करत मोबाईल धारकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अॅपलच्या निर्णयानुसार सध्या भारतात iPhone 12, iPhone 13 मिनी, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max बंद करण्याचा निर्णय घेतला. iPhone 14 आणि iPhone 14 Plus ची विक्री मात्र भारतात सुरुच राहणार असल्याचं अॅपल कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
iPhone 14 Pro Max हा मागील वर्षातील हायएंड मॉडेल होता ज्याची किंमत 1,39,900 रुपये इतकी होती. आता मात्र हे फोन भारतीय वेबसाईटवर लिस्टेड नसल्याचं लक्षात येत आहे.
अॅपलकडून iPhone 12 हे मॉडेलही असंच सीरिजमधून बंद करण्यात आलं होतं. आताच्या घडीला iPhone 12 हे सर्वात जुनं मॉडेल असून, ते 2020 ला लाँच झाला होता ज्याची किंमत 59,900 रुपये इतकी होती.