भारतीय बाजारपेठेत लवकरच एक नवा स्मार्टफोन लाँच होणार आहे. या मोबाईलमध्ये 8 जीबी रॅम मिळेल. विशेष म्हणजे या मोबाईलची किंमत 7 हजारांपेक्षा कमी असणार आहे.
itel आपल्या हँडसेटचं टीझर पोस्टर जारी केलं आहे. यावरुन itel A60s लवकरच भारतात लाँच होईल असं दिसत आहे. नुकतंच या ब्रँडने इतरही फोन लाँच केले आहेत. ज्यामध्ये itel S23, Circle 1 यांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हा हँडसेट 7000 रुपयांच्या किंमतीत 8जीबी रॅममध्ये उपलब्ध असणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असू शकतो.
itel A60s च्या रॅमबद्दल बोलायचं गेल्यास यामध्ये एकूण 8 जीबी रॅम असणार आहे. ज्यामध्ये 4GB फिजिकल आणि 4GB व्हर्च्यूअल रॅमचा वापर करण्यात आला आहे.
itel A60s हा आधी लाँच करण्यात आलेल्या itel A60 चं अपग्रेड व्हर्जन आहे.
हा हँडसेट Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Amazon Prime Days Sale दरम्यान हा फोन लिस्टेड होईल, जे 15 जुलैपासून सुरु होणार आहे.
itel A60s मध्ये 6.6 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये HD+ रिझोल्यूशन मिळणार आहे.
itel A60s मध्ये 5000 mAh च्या बॅटरीचा वापर केला जाणार आहे. 10W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा लाँच होणार आहे. अधिकृत पोस्टरनुसार, यामध्ये फिजिकल फिंगरप्रिंटचा वापर केला जाईल.