सेल्टॉस फेसलिफ्टच्याच धर्तीवर Sonet चा नवा अवतार फार अपेक्षा निर्माण करत आहे. कंपनी कारच्या एक्स्टिरिअरपासून ते आहे.
जवळपास 1 वर्षांपासून अपडेटेड किया सोनेटची चाचणी सुरु आहे. यात नवा फ्रंट बंपर दिला जाणार आहे. याशिवाय नव्या डिझाइनचा हेडलँप, डे टाइम रनिंग लाइट्स आणखी आकर्षक असतील.
टेस्टिंग कारच्या आधारे सांगितलं जात आहे की, यामधील क्रोम एलिमेंट्स आणि बॉडी क्लॅडिंगमध्ये बदल केला जाणार आहे. याशिवाय अलॉय व्हीललाही नवं डिझाइन दिलं जाऊ शकतं.
नव्या सोनेटमध्ये नव्या स्विच गेअरसह डॅशबोर्ड लेआऊटमध्येही बदल केला जाणार आहे. यामध्ये सेल्टोस फेसलिफ्टची स्क्रीनही मिळू शकते.
ही कार बाजारात हुंडई वेन्यू, टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेजा आणि मारुती फ्रांक्स यांना स्पर्धा देणार आहे. कंपनीच्या सध्याच्या मॉडेलची किंमत 7.79 लाख आहे.