24,900 कोटींच्या जहाजामुळे मार्क झुकरबर्ग अडचणीत! सर्व स्तरातून टीकेची झोड

Swapnil Ghangale
May 08,2024

बोटीमुळे वादात सापडला

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग त्याच्या 24,900 कोटींच्या बोटीमुळे वादात सापडला आहे.

बोटीचं नाव काय?

मार्कची ही 24,900 कोटींची बोट एक सुपरयाच आहे. या सुपरयाचचं नाव 'Launchpad' (लॉन्चपॅड) असं आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

लॉन्चपॅड मार्च 2024 मध्ये पहिल्यांदा समुद्रात उतरली. ही सुपरयाच फारच आलिशान असून त्यामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

लांबलचक आणि आलिशान

एका नामवंत स्विडीश कंपनीने ही बोट डिझाइन केली आहे. या बोटीची लांबी 118 मीटर असून ती स्टील आणि अॅल्युनिमियमपासून तयार करण्यात आली आहे.

सर्वात मोठ्या याचपैकी एक

5 हजार टन वजनाची ही बोट 24 नॉट्स वेगाने धावू शकते. ही जगातील 45 वी सर्वात मोठी याच आहे. यावर एक हेलिपॅडही आहे.

दोन मुळ मुद्द्यांमुळे वाद

खरं तर 'लॉन्चपॅड'वरुन सुरु झालेला हा वाद आलिशान लाइफस्टाइल आणि पर्यावरणासंदर्भातील संवेदनशीलता या दोन गोष्टींमुळे निर्माण झाला आहे. पर्यावरणवादी मार्ककडे एवढी आलीशान बोट असल्याने वादाला तोंड फुटलंय.

पर्यावरणासाठी हानीकारक

मार्कची ही आलिशान बोट पर्यावरणासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीमुळे समुद्रातील पाणी मोठ्याप्रमाणात दुषित होतं.

पाण्याच्या प्रदुषणात मोठा वाटा

खाजगी जेट विमानांमुळे जसं हवेचं प्रदुषण होतं तसेच पाण्यासंदर्भातील प्रदुषणात या मार्ककडे असलेल्या अशा अलिशान याचचा वाटा मोठा असतो.

पर्यावरणवादी असल्याचा मार्कचा दावा

मार्क झुकरबर्ग हा कायमच आपण पर्यावरणासंदर्भात संवेदनशील असल्याचं सांगतो. मात्र आता त्याच्याकडे अशी बोट असल्याने हा विरोधाभास असल्याची टीका केली जात आहे.

बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास

मार्कचं बोलणं आणि वागणं विरोधाभासी असल्याचं टीकाकार म्हणतात. मागील वेळेस त्याच्याकडील एका खासगी जेट विमानाने 2 महिन्यात 158000 अमेरिकन डॉलर्सचं इंधन संपवलं होतं.

वादात सापडला

आता पुन्हा या याचमुळे मार्क वादात अडकला असून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.

VIEW ALL

Read Next Story