फक्त 42 रुपयांत महिनाभर पळवा ही ई-बाईक, किंमत फक्त 50 हजार रुपये

Dec 26,2023

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरसह सायकलचाही ट्रेंड वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांना ई-बाईक म्हणून प्रमोट केलं जात आहे.

या ई-बाईक फक्त खिशाला परवडणाऱ्य़ा नसतात तर त्यांचं ड्रायव्हिंग आणि मेंटेनन्सही सोपं असतं.

अशाच एका ई-बाईकबद्दल जाणून घ्या. ही बाईक फक्त 7 पैशात एक किमी धावत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Motovolt ने नुकतंच भारतीय बाजारपेठेत आपली URBN Electric Bike सादर केली आहे. हिची किंमत 49 हजार 999 रुपयांपासून ते 54 हजार 999 पर्यंत आहे.

ही बाईक फक्त 999 रुपयांत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन बूक करु शकता.

यामध्ये इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी पॅकव्यतिरिक्त पॅडल रायडिंगचीही सुविधा मिळते. त्यामुळे बॅटरी संपल्यास चालक पॅडल मारु शकतो.

40 किलो वजन असणाऱ्या ई-बाईकला मोठी सीट आहे. हिची लांबी 1700 मिमी, रुंदी 645 मिमी आणि उंची 101 मिमी आहे.

या ई-बाईकची 120 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या ई-बाईकची रनिंग कॉस्ट महिना 42 रुपये असल्याचा कंपनीचा दावा आहे. सिंगल चार्जमध्ये ही बाईक 120 किमी धावेल.

बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. फक्त 10 सेकंदात ही बाईक ताशी 0 ते 25 चा वेग पकडण्यात सक्षम आहे.

VIEW ALL

Read Next Story