Maruti, Tata ची झोप उडणार, फक्त 6.50 लाखात लाँच झाली सर्वात स्वस्त Automatic SUV; मायलेजही जबरदस्त

Oct 10,2023

Nissan Magnite AMT

निसान मोटर इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या प्रसिद्ध एसयुव्हीमधील सर्वात स्वस्त एसयुव्ही मॅग्नाइटच्या नव्या EZ-Shift ऑटोमॅटिक व्हेरियंटला लाँच केलं आहे.

किंमत किती?

या एसयुव्हीची सुरुवातीची किंमत 6 लाख 49 हजार 900 रुपये (Ex Showroom) ठेवण्यात आली आहे. ही किंमत 10 नोव्हेंरपर्यंत अधिकृत असणार आहे. म्हणजे यानंतर किंमत वाढू शकते.

सर्वात स्वस्त ऑटो एसयुव्ही

या किंमतीसह ही देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एसयुव्ही ठरली आहे. सध्या या कारला फक्त इंट्रोडक्टरी किंमतीसह लाँच करण्यात आलं आहे.

तीन सिलेंडर पेट्रोल

Nissan Magnite च्या या ऑटो व्हेरियंटमध्ये कंपनीने 1.0 लीटर क्षमतेच्या नॅच्यूरल एक्स्पिरेटेड तीन सिलेंडर पेट्रोलचा वापर केला आहे, ज्याला 5 स्पीड एएमटीशी जोडण्यात आलं आहे.

5 स्पीड मॅन्यूअल गेअरबॉक्स

Nissan Magnite 5 स्पीड मॅन्यूअल गेअरबॉक्ससह येते. याचा मॅन्यूअल व्हेरियंट 19.35 किमी प्रती लिटर आणि ऑटोमॅटिक व्हेरियंट 19.70 किमी प्रती लिटर मायलेज देण्यात सक्षम आहे.

दोन ड्रायव्हिंग मोड्स

Nissan Magnite EZ-Shift मध्ये दोन ड्रायव्हिंग मोड्स मिळतात. या एसयुव्हीत ऑटो आणि मॅन्यूअल दोन्ही ड्रायव्हिंग मोडमध्ये निवडण्याचा पर्याय आहे.

वाहतूक कोंडीसाठी क्रीप फिचर

वाहतूक कोंडीत क्रीप फिचर तुम्हाला एक्सलेटरचा वापर न करता फक्त ब्रेकचा वापर करत धीम्या गतीवर कार चालवण्याची सुविधा देतं.

फिचर्स काय आहेत?

या कारमध्ये वायरलेस अँड्रॉईड ऑटो आणि अॅप्पल कार-प्ले यासह 8 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि 7 इंज डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरसह येतो. यात पुश बटण स्टार्ट-स्टॉप आणि रेअर वेंटसह ऑटो एसी मिळतो.

सुरक्षा फिचर्स

सुरक्षेसाठी यामध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, हिल स्टार्ट असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंगसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story