टाटा मोटर्स आता वेगाने इलेक्ट्रिक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने देशातील बेस्ट सेलिंग कार Nexon EV च्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केलं होतं.
टाटा हॅरिअरने आयसीई मॉडेलच्या प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या या एसयुव्हीच्या कॉन्सेप्ट मॉडेलला सादर केलं होतं. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत ही कार बाजारात येण्याची शक्यता आहे.
याच्या स्लिकमध्ये LED डे टाइम रनिंग लाईट्स, स्प्लिट हेडलँपसह एलईडी टेललाइटही दिली जात आहे. यामध्ये कंपनी 12 इंचाचं टचस्क्रीन इंफोटेनमेंट देऊ शकते. यामध्ये कंपनी 40kW क्षमतेचा बॅटरी पॅक देत आहे.
टाटा कर्व्ह कॉन्सेप्टला ICE आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही व्हर्जनमध्ये सादर केलं जाणार आहे. ही कूपे-स्टाइल इलेक्ट्रिक एसयुव्ही असेल. पुढील वर्षापर्यंत ही कार लाँच होण्याची शक्यता आहे.
ही कार लाँच होण्याआधी किंमत आणि रेंजबद्दल बोलणं थोडं कठीण आहे. ही एसयुव्ही सिंगल चार्जमध्ये 450 ते 500 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त एसयुव्ही पंचच्या इलेक्ट्रिक व्हर्जनना कंपनी नेहमी टेस्ट करताना दिसते. या कारला 10 ते 12 लाख किंमतीत लाँच केलं जाऊ शकते.
शक्यता आहे की, यामध्ये कंपनी टियागो ईव्ही आणि टिगोर ईव्हीसारख्या बॅटरीचा वापर करु शकते. ही एसयुव्ही 300 ते 350 किमीची रेंज देऊ शकते.
Tata Avinya थर्ड जनरेशनच्या आर्किटेक्चरवर निर्मित इलेक्ट्रिक वाहन कॉन्सेप्ट आहे. या कारला कंपनीने फ्युचरिस्टीक डिझाइन दिलं आहे. यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी योग्य जागा आणि चांगल्या सुविधा मिळतीत.
Tata Avinya मध्ये हलकं मटेरियल वापरण्यात आलं आहे, जे चांगली ड्रायव्हिंग रेज देण्यास मदत करतं. याची बॅटरी फक्त 30 मिनिटात चार्ज होते आणि 500 किमीची रेंज देते.
Tata SIERRA देशातील पहिली एसयुव्ही असेल ज्यामध्ये रॅप ओव्हर विंडो पाहायला मिळेल. या इलेक्ट्रिक एसयुव्हीला कंपनीने मागील ऑटो एक्स्पोदरम्यान पहिल्यांदा सादर केलं होतं.
4.3 लांब या कारमध्ये मोठा व्हिलबेस देण्यात आला आहे, जेणेकरुन मोठे बॅटरी पॅक यात व्यवस्थित राहतील. रेंजबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही, पण ती 500 पर्यंत असेल असा अंदाज आहे.