एसयुव्हीची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. खासकरुन कॉम्पॅक्ट एसयुव्ही कारला जास्त पसंती दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात एसयुव्ही कारची मोठी विक्री झाली आहे.
Hyundaui CRETA देशातील पाचवी सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही ठरली आहे. कंपनीने मागील ऑक्टोबर महिन्यात एकूण 13,077 युनिट्सची विक्री केली.
महिंद्राची Scorpio चौथी सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही ठरली आहे. याच्या एकूण 13 हजार 578 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गतवर्षीच्या तुलनेत 83 टक्के जास्त आहे.
टाटाची सर्वात स्वस्त मिनि एसयुव्ही पंचने जोरदार उसळी घेतली आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनीने एकूण 15 हजार 317 युनिट्सची विक्री केली. मागील वर्षीच्या तुलनेत ही विक्री 39 टक्के जास्त आहे.
Maruti Brezza दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने एकूण 16 हजार 50 युनिट्सची विक्री केली. मागील ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत ही विक्री 61 टक्के जास्त आहे.
Tata Nexon च्या फेसलिफ्ट मॉडेलला नुकतंच लाँच करण्यात आलं होतं. कंपनीने ऑक्टोबर महिन्यात एकूण 16 हजार 887 युनिट्सची विक्री केली. गतवर्षी 13 हजार 767 युनिट्सची विक्री झाली होती.