नेकबँड, इअरबड्स किंवा हेडफोन कानाला लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याचं सध्या फॅड आहे. तरुणाईमध्ये याची विशेष क्रेझ आहे.

Aug 18,2023


पण तुम्हाला माहित आहे की हे फॅड तुमच्या आरोग्यावर परिणामकारक ठरु शकतं. मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने बहिरेपण येऊ शकतं.


बाजारात अनेक चांगल्या ब्रँडचे नेकबँड, इअरबड्स किंवा हेडफोन उपलब्ध आहेत. त्यांची आवाजाची क्वालिटीही दमदार असते. त्यामुळे युजर्स मोठ्या आवाजात गाणी ऐकताना दिसतात.


पण किती मोठ्या आवाजात गाणी ऐकावीत हे जाणून घेणं गरजेचं आहे. आवाजाचं मोजमाप करण्यासाटी डेसिबल युनिटचा वापर केला जातो. माणसाच्या कानांसाठी 70 dBA आवाज सुरक्षित मानला जातो.


पण 85 dBA हून अधिक आवाजात गाणी ऐकल्यास कानाच्या पडद्यावर परिणाम होऊ शकतो. आणि बहिरेपणही येऊ शकतं.


नेकबँड, इअरबड्स किंवा हेडफोनमधून येणाऱ्या आवाजाची क्षमता तुम्ही मोफत तपासू शकता. यासाठी प्ले स्टोरवर काही अॅप उपलब्ध आहेत.


या अॅप्लिकेशनवर तूम्ही डेसिबलमध्ये हेडफोनचा आवाज तपासू शकता. गुगल प्ले स्टोरवर साऊंड मीटर किंवा डेसिबल मीटर नावाने अॅप उपलब्ध आहेत.


नेकबँड, इअरबड्स किंवा हेडफोन मोबाईलला लावून त्याचा आवाज सुरु करा. त्यानंतर मोबाईलमधलं साऊंड मीटर अॅप उघडा आणि डेसिबल तपासा


याशिवाय ऑनलाईन किंवा ऑफलाईनही डेसिबल यंत्र विकत घेऊ शकता. अॅमेझोनवर हे यंत्राची किंमत 1499 रुपयांपासून सुरुवात होते.

VIEW ALL

Read Next Story