Tecno कडून एक स्वस्त स्मार्टफोन Tecno Spark Go 2024 बाजारात आला आहे. कंपनीने हा कमी बजेट फोन म्हणून भारतात लॉन्च केला आहे.
स्वस्त असूनही, फोन अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट फिचर्ससह येतो. हा कंपनीचा परवडणारा Spark मालिकेतील नवीनतम फोन आहे.
या फोनची किंमत भारतात जाहीर करण्यात आली आहे. 64GB व्हेरिएंटची किंमत 6,699 रुपये आहे. 8GB RAM + 64GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज मॉडेल्सची किंमत सांगण्यात आलेली नाही. फोनची विक्री 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
फोनमध्ये आयफोन सारखा डायनॅमिक पोर्ट आहे, जो नोटिफिकेशननुसार त्याचा आकार बदलतो. सेफ्टीसाठी फोनच्या मागील पॅनलवर एक फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
फोनमध्ये 6.65-इंचाचा डॉट-इन डिस्प्ले आहे, जो पांडा स्क्रीन प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये सेगमेंट फर्स्ट 90 Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे, जो खूप स्मूथ आहे
या टेक्नो फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत जे डीटीएस तंत्रज्ञानासह येतात. फोनमध्ये Unisoc T606 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे जो 1.6 GHz वर चालतो.
Tecno Spark Go (2024) मध्ये 13-मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि AI लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. समोर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. बायोमेट्रिक अनलॉकिंगसाठी हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
Tecno ने नवीन Spark Go (2024) मध्ये 5,000mAh बॅटरी दिली आहे. एका चार्जवर ही बॅटरी पूर्ण दिवस टिकू शकते. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.