स्क्रीन गार्ड लावल्यानंतर, तुमच्या फोनवर टच सेन्सर सुरु करा. स्क्रीन गार्ड लावल्यानंतर हे फिचर उपयोगी पडते
स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने स्क्रीन गार्ड बनवले असेल तर त्याला प्राधान्य द्या. या कंपन्या स्क्रीन गार्ड बसवण्याचे किटही सोबत देतात.
टेम्पर्ड स्क्रीन गार्ड हे फ्लॅट स्क्रीनवर उत्तम काम करते. त्यामुळे फ्लॅट स्क्रीन असणाऱ्या स्मार्टफोनसाठी टेम्पर्ड स्क्रीन गार्ड वापरता येऊ शकते.
सध्या बाजारात बफ स्क्रीन गार्ड हे ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये प्लास्टिकचा पातळ थर असतो.
तुमची गरज काय आहे हे लक्षात घेऊन स्क्रीन गार्ड घ्यावा. बाजारात प्लास्टिक आणि टेम्पर्ड अशा प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध असतात.