व्हॉट्सॲपमध्ये नवीन अपडेट, युजर्सचा रोजचा त्रास कायमचा संपणार

Pravin Dabholkar
Jun 18,2024


WhatsApp New HD Photo Feature: मेटाच्या मालकीच्या इन्स्टंट मल्टीमीडिया मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने यूजर्सची सर्वात मोठी समस्या सोडवली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नवीन अपडेट जारी केले आहे.


व्हॉट्सअ‍ॅपचे डीफॉल्ट मीडिया फाइल स्वरूप आता HD झाले आहे. जेव्हा आपण एखाद्याला फोटो किंवा व्हिडिओ पाठवतो तेव्हा आपल्याला HD पर्याय निवडावा लागतो.


पण आता ते डीफॉल्टनुसार HD असेल. यावर्षी मार्चमध्ये व्हॉट्सअ‍ॅपने एचडी फोटो-व्हिडिओचा सपोर्ट जारी केला होता.


व्हॉट्सअ‍ॅपची डीफॉल्ट मीडिया गुणवत्ता बदलली आहे 'अँड्रॉइड पोलीस' ने याबाबत सर्वप्रथम माहिती दिली.


आता कोणताही फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना त्याची क्वालिटी HD वर सेट करण्याची गरज नाही.


आता हे सेटिंग बाय डीफॉल्ट एचडी असेल मात्र यासाठी तुम्हाला ते आधी सेटींग करावी लागेल.


डीफॉल्ट मीडिया क्वालिटी HD साठी, स्टोरेज आणि डेटा सेटिंग्ज वर जा आणि HD निवडा.


SD गुणवत्तेत, मीडिया फाईल्स लगेच शेअर होतात तसेच डेटाचा वापर देखील कमी होतो.


HD मध्ये, SD पेक्षा 6 पट मोठ्या फाईल्स असतात. ज्यासाठी अधिक डेटा वापरला जातो.

VIEW ALL

Read Next Story