WhatsApp नेहमी युजर्ससाठी नवनवीन अपडेट घेऊन येतात. अलीकडेच कंपनीने नवीन फिचर जारी केलं आहे
आता युजर्स WhatsApp च्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेता येणार आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅपने DPचा स्क्रीनशॉट ब्लॉक केला आहे.
व्हॉट्सअॅपने बीटा व्हर्जन 2.24.4.25 जारी केला आहे. या अपडेटमध्ये प्रोफाइल फोटोचे स्क्रीनशॉट काढता येणार नाहीये. हे फिचर सध्या काहीच बीटा युजर्सपर्यंत पोहोचले आहे.
Wabetinfoने एक स्क्रीनशॉट शेअर करुन ही माहिती दिली आहे. जेव्हा त्यांनी लेटेस्ट बीटी व्हर्जनच्या मदतीने स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे फिचर ब्लॉक असल्याचे लक्षात आले
आजकाल Deepfakeच्या मदतीने व्हिडिओ बनवण्यासाठी लोक सोशल मीडियाच्या मदतीने फोटो डाऊनलोड करतात. अशावेळी या फिचर्सने खूप मदत होणार आहे
WhatsaAppने प्रायव्हसीचा विचार करुन 5 वर्षांपूर्वीच प्रोफाइल फोटो सेव्ह करण्याचे फिचर रिमूव्ह केले आहे.
अनेकजण प्रोफाइल फोटो सेव्ह करुन त्याचा गैरवापर करतात. अशावेळी व्हॉट्सअॅपचे हे फिचर खूप फायदेशीर ठरणार आहे.
सध्या हे फिचर बीटा व्हर्जन आहे. सर्व टेस्टिंग कंप्लीट झाल्यानंतर स्टेबल व्हर्जन जारी करण्यात येईल