YouTube म्हणजे मनोरंजनाचं ठिकाण

YouTube म्हणजे अनेकांसाठी मनोरंजनाचं ठिकाण आहे. पण काहींसाठी मात्र हे उत्पन्नाचं एक स्तोत्र आहे. येथे आपले सबस्क्रायबर्स वाढवण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा सुरु असते.

Aug 08,2023

MrBeast ने T-Series दिलं होतं आव्हान

काही दिवसांपूर्वी युट्बूयवर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या MrBeast ने T-Series ला पहिल्या क्रमांकासाठी आव्हान दिलं होतं. पण त्यांच्यात जवळपास 73 मिलियनचं अंतर आहे.

YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते?

दरम्यान YouTube वर सर्वाधिक सबस्क्रायबर्स असणारे चॅनेल्स कोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग जाणून घ्या

T-Series

T-Series चे 246 मिलियन सबस्क्रायबर्स असून, पहिल्या क्रमांकावर आहे. येथे तुम्हाला T-Series ची सर्व गाणी, व्हिडीओ अल्बम पाहण्यास मिळतील.

MrBeast

MrBeast चे 173 मिलियन सबस्क्रायबर्स असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो अनेक मनोरंजनात्मक व्हिडीओ शेअर करत असतो. यामध्ये तो अनेक स्टंटही करताना दिसतो.

Cocomelon - Nursery Rhymes

Cocomelon चे 163 मिलियन सबस्क्रायबर्स असून तिसऱ्या क्रमांकाचं चॅनेल आहे. हे लहान मुलांच्या मनोरंजनाचं चॅनेल आहे.

SET India

सोनी एंटरटेनमेंटचे 160 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. येथे तुम्हाला सोनीशी संबंधित सर्व व्हिडीओ पाहायला मिळतात.

Kids Diana Show

Kids Diana Show हे लहान मुलांच्या मनोरंजनासाठीचं युट्यूब चॅनेल असून त्यांचे 113 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

PewDiePie

PewDiePie चे तब्बल 111 मिलियन सबस्क्रायबर्स असून सहाव्या क्रमांवर आहे.

Like Nastya

Like Nastya हे देखील लहान मुलांसाठीचं युट्यूब चॅनेल असून 106 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

Vlad and Niki

Vlad and Niki हेदेखील लहान मुलांच्या मनोरंजनासाठीचं युट्यूब चॅनेल आहे. त्यांचे 99 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत.

Zee Music Company

Zee Music Company चे 97 मिलियन सबस्क्रायबर्स असून येथे त्यांची सर्व गाणी पाहण्यास मिळतात.

WWE

एकेकाळी WWE ची प्रचंड क्रेझ होती. युट्बूयवर तर त्यांचे 96 मिलियन सबस्क्रायबर्स असून 10 व्या क्रमांकाचं चॅनेल आहे.

VIEW ALL

Read Next Story