फोन उचलल्यानंतर आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण पहिला शब्द उच्चारतो तो म्हणजे 'हॅलो'! 'हॅलो, कोण बोलतंय?' अशी सामान्यपणे आपल्या संवादाची सुरुवात असते.
पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की हा 'हॅलो' शब्द आला कुठून?
प्रसिद्ध संशोधक ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला.
ग्रॅहम बेल यांच्या प्रेयसीचे नाव 'हॅलो' होते. टेलिफोनचा शोध लागल्यावर ग्रॅहम बेल यांनी पहिला फोन आपल्या प्रेयसीला लावला आणि ते पहिला शब्द 'हॅलो' म्हणाले.
तेव्हापासून फोन कॉलवर बोलताना 'हॅलो' म्हणत बोलण्याची सुरुवात झाली.
हॅलो बोलल्यानं लोकांमधील परस्पर कडवटपणा दूर होतो, असंही मानलं जातं.
1973 मध्ये योम किप्पूर युद्धादरम्यानच्या संघर्षात हजारो सैनिक व नागरिकांनी प्राण गमावले.
हे युद्ध संपल्यानंतर 'हॅलो' हा शब्द शांतता आणि सद्भावनेचं प्रतिक म्हणून उदयास आला.