संपूर्ण देशाभरात दिवाळी सणाची उत्सुकता आहे. तर दिवाळीमध्ये अनेकदा खरेदी ही शुभ मानली जाती आपण वाहन, दागिने आणि इतर वस्तूंची खरेदी करतो.

Nov 07,2023


म्हणूनच दिवाळीनिमित्त अनेक वाहन कंपन्या त्यांची विक्री वाढवण्यासाठी सणासुदीच्या ऑफर्स देतात.


अशा वेळेस जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कंपन्यांच्या ऑफर्सबद्दल माहिती असावी म्हणून जाणून घेऊया दिवाळीनिमित्त ऑफर्स .

सणासुदीच्या काळात कंपन्या किती सूट देतात ?

कार कंपन्या वेगवेळ्या मॉडेल्सवर ₹ 25,000 रुपयांपासून ते ₹1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत.

सणासुदीच्या काळात कंपन्या सहसा 5 प्रकारच्या सूट देतात:

एक्सचेंज डिस्काउंट, फेस्टिव्हल डिस्काउंट, बँक डिस्काउंट ऑफर, अॅक्सेसरीज डिस्काउंट, वॉरंटी एक्सटेंडेड ऑफर तर बघूया हे ऑफर्स प्रत्येक कंपनीनुसार कसे आहेत

4 व्हिलर ऑफर :

मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांना एक्सचेंज बोनस देते ज्यामध्ये ₹10,000 ते ₹ 20,000 ची सूट भेटू शकते.

टाटा मोटर्स :

टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना 3 वर्षे आणि 1 लाख किलोमीटर वारंटी, एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट सवलत देते.

हुंडाई :

हुंडाई आपल्या ग्राहकांना एक्सचेंज बोनसमध्ये ₹10,000 आणि कॉर्पोरेट सवलत ₹ 3000 पासून सुरू होते.

महिंद्रा :

महिंद्रा आपल्या ग्राहकांना सवलत, एक्सचेंज ऑफर आणि ₹ 25000 अ‍ॅक्सेसरीज पर्यंतचे ऑफर्स देते.

२ व्हिलर ऑफर :

हिरो आपल्या ग्राहकांना ₹ 5000 रुपेय पर्यंत एक्सचेंज बोनस, खरेदी करून 2024 मध्ये नंतर पैसे द्या असा ऑफर ही देतात, आणि व्याज = ६.९९ %.

होंडा :

होंडा आपल्या ग्राहकांना 0 डाऊन पेमेंट, EMI खर्च सूट, व्याज = ६.९९ आणि 5000 पर्यंत 10% कॅश बॅक देतात.

सुझुकी :

सुझुकी ही ग्राहकांना ₹ 5000 पर्यंत कॅश बॅक, ₹ ६,९९९ चे राइडिंग जॅकेट मोफत आणि कर्ज मंजूरी देते. तर दिवाळीसाठी आपल्या घरी वेगवेगळ्या ऑफर्स सह तुम्ही या गाड्यांची खरेदी करू शकता.

VIEW ALL

Read Next Story