Burj Khalifa : बुर्ज खलिफावर एक फोटो दाखवण्यासाठी शाहरुख किती पैसा मोजतो?
बुर्ज खलिफा ही इमारत तिच्या भव्यतेसोबतच आणखी एका कारणामुळं चर्चेत असते ती म्हणजे त्यावर केली जाणारी जाहिरातबाजी.
बेबी शॉवर असो किंवा मग एखाद्या ब्रँडची जाहिरात. जगातील या सर्वात उंच इमारतीवर अनेकदा ही दृश्य पाहायला मिळतात.
इतकंच नव्हे, तर शाहरुख खानच्या किंवा इतर बॉलिवूड चित्रपटांची जाहिरातही या इमारतीवर केली जाते.
Arabian Business च्या वृत्तानुसार एखाद्या चित्रपटाचा टीझर किंवा एखादा संदेश बुर्ज खलिफावर तीन मिनिटं दाखवण्यासाठी भारतीय चलनानुसार साधारण ₹5,662,093.65 रुपये मोजावे लागतात. रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान जाहिरात करण्यासाठी हीच किंमत दुपटीनं वाढून Dhs500,000 म्हणजेच 11,341,374.43 रुपयांच्या घरात जाते.
बुर्ज खलिफावर एखादी जाहिरात, संगीत व्हिडीओ, किंवा फक्त आवाजाचा वापर करायचा झाल्यास त्यासाही घसघशीत रक्कम आकारली जाते.
बुर्ज खलिफावर जाहिरात करण्यासाठी रितसर विनंती अर्ज करावा लागतो. ज्यानंतर त्यावर या इमारतीचे मालक Emaar यांची परवानगी घेण्यात येते.
मालकांची परवानगी मिळाल्यानंतर सविस्तर कलात्मक संकल्पना निश्चित करून जाहिरात प्रदर्शित होण्याच्या चार आठवड्यांपूर्वी पूर्ण रक्कम भरून या व्यवहारावर शिक्कामोर्तब केलं जातं.