बर्थ-डे असला की हमखास त्या दिवशी केक कापला जातो. केक कापल्याशिवाय वाढदिवस हा अपूर्णच राहिल्यासारखा वाटायला लागतो.
प्रत्येकाला वाढदिवस केक कापून साजरा करावासा वाटतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का की बर्थ-डेला लोक केक का कापतात?
वाढदिवसाला केक कापण्याची ही प्रथा प्राचीन ग्रीक (यूनान)मध्ये सुरू झाली होती. युनानी देवी आर्टेमिसच्या जन्मदिवशी केकवर मेणबत्ती लावून कापला जातो.
युनानी मान्यनांनुसार, आर्टेमिस चंद्राची देवता आहे. त्यामुळं त्यांच्या जन्मदिवशी लोक गोल केक कापतात.
गोल केक चंद्रमाचे प्रतीक असते. त्याचबरोबर त्यावर असलेल्या मेणबत्त्या या प्रकाश दर्शवतात.
म्हणूनच आर्टेमिसच्या जन्मदिवशी केक कापला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली ही प्रथा आता जगभरात पसरली आहे.
आता जवळपास प्रत्येक देशात केक कापून वाढदिवस साजरा केला जातो.