अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवण्यासाठी 1906 मध्ये भिकाजी बलसारा यांनी मोठा संघर्ष केला. यासाठी न्यायालयात खटलाही चालवण्यात आला होता.
बलसारा यांच्यामुळं आर्यन श्रेणीमध्ये भारतीयांना समाविष्ट करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला.
पारसी समुदायाचे सदस्य म्हणून त्यांना अमेरिकेचं नागरिकत्वं दिलं.
सर्किट कोर्ट ऑफ अपील्सनं त्यांच्या बाजूनं निर्णय दिला. आप्रवसन अधिनियमनानंतर भारतीय अमेरिकेत आले.
पंजाबी अनिवासी भारतीयांनी सर्वप्रथम मेक्सिकोवाटे अमेरिकेत प्रवेश केला.
गदर पक्षानं भारताच्या स्वातंत्र्यासाठी अमेरिकेतून अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला होता.