चंद्र आणखी किती वर्ष देईल पृथ्वीची साथ?
अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था, नासाच्या मते चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून सुमारे दीड इंच (3.8 cm) दूर जात आहे.
नासाच्या अपोलो मिशनच्या दरम्यान चंद्रावर लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टिव पॅनल्सच्या मदतीने हा शोध लावला आहे.
गुरूत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे.
चंद्राच्या गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्र चंद्राच्या दिशेने पुढे जात आहेत ज्यामुळे चंद्राचा आकार फुटबॉलप्रमाणं असतो.
पृथ्वीचं वय अतिशय कमी होतं तेव्हा ती इतकी वेगाने फिरायची की एक दिवस 5 तासांत संपायचा, परंतु चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे दिवस 24 तासांचा झाला.
आजपासून सुमारे 5 अब्ज वर्षानंतर जेव्हा सूर्याचा अंत होईल तेव्हा चंद्र आणि पृथ्वीचा नाश होईल.
याचा अर्थ असा की, चंद्र आणि पृथ्वीचा नाश सूर्यापासून, सूर्यामुळंच होईल.