दिल्लीत सुरु असलेल्या G20 मध्ये जगभरातील टॉप लीडर्स पोहोचले आहेत. पण आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानचा प्रतिनिधी यामध्ये का दिसत नाही?
जी 20 ग्रुपमध्ये असलेली राष्ट्रच येथे सहभागी होऊ शकतात. पाकिस्तान जी 20 चा हिस्सा नाही. त्यामुळे त्यांना निमंत्रण नव्हते.
जी 20 ही पाकिस्तानसाठी खूपच दूरची गोष्ट आहे. कर्ज, महागाईमुळे पाकिस्तानचे आधीच दिवाळे निघाले आहे.
जी 20 ची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली होती. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांनी यात सहभाग घेतला.
पाकिस्तान तेव्हाही एक मजबूत अर्थव्यवस्था नव्हता. आजही त्याची परिस्थिती सुधारली नाही.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था टॉप 40 मध्येदेखील नाही. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याकडे वाटचाल करत आहे.
1971 मध्ये पाकिस्तानपासून वेगळा झालेला बांग्लादेशदेखील अर्थव्यवस्थेत पाकिस्तानच्या पुढे निघून गेला आहे.
जी 20 मध्ये भारतासोबत अमेरिका, इटली, तुर्की, साऊथ आफ्रिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन, रशिया आणि मजबूत राष्ट्रांचा सहभाग आहे.
आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरतेवर चर्चा आणि महत्वपूर्ण विकसनशील अर्थव्यवस्थांना सोबत घेण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली.