भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी वयाच्या 68व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली
साळवे यांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या ट्रीनासोबत विवाह केला आहे. त्यांच्या या विवाहसोहळ्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
हरिश साळवेंच्या लग्नात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यात निता अंबानी यांनीदेखील उपस्थिती दर्शवली होती.
इतकंच नव्हे तर, ललित मोदी आणि त्यांच्या प्रेयसीनेही या लग्नात हजेरी लावली होती. त्यावेळी सर्वात जास्त चर्चा ही ललित मोदी यांचीच होती.
ललित मोदी यांची गर्लफ्रेंड उज्वला राऊतही देखील लग्नात सहभागी झाली होती.
उज्वला राऊत हिने लाइट ब्लू रंगाचा कटआउट गाऊन परिधान केला होता. त्याचबरोबर मिनिमल एक्ससरीजदेखील परिधान केली होती.
ट्रिना आणि हरिश साळवे केक कट करत असतानाच उज्वला हा मुमेंट सेलिब्रेट करताना दिसत आहे.