ही आकडेवारी ग्लासडोअर या कंपनीच्या एका अहवालामधील असून हा अहवाल अधिक पगाराच्या नोकऱ्यासंदर्भातील आहे.
सॉफ्टवेअर डेव्हलपर मॅनेजर वर्षाला 77 लाखांपर्यंत पगार घेतात.
आयटी मॅनेजर संशोधनाच्या माध्यमातून तांत्रिक दृष्ट्या सध्या उपलब्ध असलेल्या यंत्रणेपेक्षा अधिक सक्षम यंत्रणा कंपनीसाठी उभारण्यास मदत करतात.
आयटी श्रेत्रामध्ये वरिष्ठ पदावर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्यांचा वार्षिक पगार हा 70 लाखांपर्यंत असतो.
सॉफ्टवेअर आर्कीटेक्टचं वार्षिक पॅकेज हे 80 लाखांपर्यंत असू शकतं.
सिक्युरिटी इंजिनियर पदावरील व्यक्ती कंपन्यांना तांत्रिक सुरक्षा पुरवण्याचं काम करतात. या मोबदल्यात त्यांना वर्षाकाठी तब्बल 60 लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळतो.
डेटा सायंटिस्टची मदत अनेक बड्या कंपन्या घेतात. हे लोक माहितीचं आकलन करुन कंपन्यांना स्पर्धात्मक जगात विरोधकांपेक्षा पुढे राहण्यासाठी मदत करतात.
डेटा सायंटिस्ट पदावरील व्यक्तीचं वार्षिक पॅकेज हे 60 ते 63 लाखांच्या दरम्यान असतं.
कंप्युटर हार्डवेअर इंजिनियर पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना 60 लाखांपर्यंतचं वार्षिक पॅकेज मिळतं.