आपल्या घरी खाण्यासाठी जे पाँढरं मीठ वापरलं जातं, ते समुद्रातून येतं.
पण समुद्रात मीठ कुठून येतं? तुम्हाला माहिती आहे का?
समुद्रात मीठ 2 मार्गांनी येतं. पहिलं तर जमिनीतून निघणारं पाणी आणि दुसरं समुद्र तळातील छिद्र.
जमिनीवरील खडक समुद्री पाण्यातील घोळलेल्या लवणांचा मुख्य स्त्रोत आहे.
या खडकांवर असलेले सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि कॅल्शियमसारखे खनिज
पावसाच्या पाण्यामुळे डोंगर, खडकांवरुन खाली येतात आणि समुद्राच्या पाण्याला जाऊन मिळतात.
जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होतं तेव्हा क्लोरीन आणि सोडीयम वेगळं होऊन सोडियम क्लोराइड बनतं.
यालाच समुद्री मीठ म्हणतात. जे समुद्रातून काढून आपल्या घरी पोहोचवलं जातं.
ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून चालत आली आहे.