तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, जगात असं एक गाव आहे जे आंधळ्यांचं गाव म्हणून त्याची ओळख आहे.
या गावातील प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वजण दृष्टीहीन आहेत.
या गावात झापोटेक जमातीचे लोक राहतात. असं म्हणतात मूल जन्माला आल्यावर पाहू शकतं पण काही दिवसांनी त्यांची दृष्टी जाते.
इथे अशी आख्यायिका आहे की, या गावात एक शापित वृक्ष आहे. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, या झाडाकडे कोणी पाहिल्यास तो आंधळा होतो.
तर तज्ज्ञांनी असा युक्तिवाद केलाय की, इथे एक विषारी माशी आहे. ती लहान मुलाला चावते आणि त्यामुळे त्यांची दृष्टी जाते.
हे गाव आहे मेक्सिकोतील टिल्टपेक. मेक्सिकन सरकारला या गावाची माहिती मिळाल्यावर ते मदत करण्यासाठी गेले असता गावकरांनी हस्तक्षेप करण्यास मनाई केली.