भारत, चीनसहित अनेक देशांसाठी वाढत्या लोकसंख्या एक आव्हान बनली आहे.यासाठी फॅमिली प्लानिंग प्रोग्राम आणले जात आहेत.
पण जगात असाही एक देश आहे, जिथे मुलांना जन्म दिल्यास तुम्हाला खूप साऱ्या सुविधा देतो.
यूरोपीयन यूनियन अंतर्गत हंगरी देशात लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार प्रति मुलासाठी लाखो रुपये खर्च करतेय.
मुलं जन्माला घातल्यास घर, कार अशा सुविधा हंगरीमध्ये दिल्या जातात.
पहिल्या मुलाच्या जन्मावेळी व्याजासहित 23 लाखापर्यंतचे कर्ज सरकारकडून मिळते.
दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी व्याज 30 टक्क्यांनी माफ केले जाते. जेणेकरुन कुटुंबाने आणखी एक कार खरेदी करावी.
तिसऱ्या बाळाच्या जन्मावेळी घर घरेदीसाठी 23 लाख रुपये दिले जातात.
चौथ्या मुलाच्या जन्मानंतर आईसाठी लाईफटाईम इनकम टॅक्स फ्री देण्यात येतो.
मुलांचा जन्मदर वाढवणं हा उद्देश असून ही सरकारसाठी महत्वाची योजना असल्याचे हंगरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान सांगतात.