न्यूझीलंड

International Sex Workers Day : 'या' देशांमध्ये देहविक्रीला कायद्याचं संरक्षण ... न्यूझीलंड या देशात देहविक्रीला 2003 मध्ये कायद्याचं संरक्षण देण्यात आलं. इथं नागरी आरोग्य आणि रोजगार कायद्याअंतर्गत कुंटणखाने काम करतात.

Jun 02,2023

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियामध्ये या गोष्टीला कायद्याचं संरक्षण असलं तरीही वेगवेगळ्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी मात्र वेगवेगळ्या पद्धतींनी होते.

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियामध्ये देहविक्रीच्या व्यवसायाला पूर्णपणे कायद्याचं संरक्षण प्राप्त आहे. इथं या महिलांना शासनदरबारी रितसर नोंदणी करावी लागते शिवाय, वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी होते इतकंच नव्हे, तर त्या करही भरतात.

बांगलादेश

इथं पुरुषांना या व्यवसायात येण्यास मनाई असली तरीही इतर गोष्टींना अनुमती आहे. इथं देहविक्री आणि कुंटणखान्यांना कायदेशीर मान्यता आहे.

ब्राझिल

ब्राझिलमध्येही देहविक्रीला कायदेशीर मान्यता आहे.

कॅनडा

कॅनडामध्ये देहविक्रीला कायद्याचं संरक्षण असलं तरीही इथं शरीरसंबंधांच्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार करणं मात्र बेकायदेशीर ठरवण्यात आलं. 2014 च्या अखेरीस हा नियम लागू करण्यात आला.

कोलंबिया

अडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्याला कोलंबियामध्ये कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. पण, इथं देहविक्रीबाबत अद्याप तत्सम कायदा नाही.

डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये देहविक्रीला कायद्याचं संरक्षण प्राप्त आहे. इतकंच नव्हे, तर इथं या क्षेत्रातील काही शारीरिक व्यंग असणाऱ्यांनाही शासनाकडून मदत मिळते.

फ्रान्स

फ्रान्समध्ये देहविक्रीला कायदेशीर संरक्षण प्राप्त असलं तरीही सार्वजनिक ठिकाणी त्याला प्रोत्साहन देणं मात्र कारवाईस पात्र आहे.

ग्रीस

इतर बऱ्याच देशांप्रमाणं ग्रीसमध्येही देहविक्रीला कायदेशीर मान्यता प्राप्त आहे. या क्षेत्रातील व्यक्तींची इथं वेळोवेळी आरोग्य तपासणीही केली जाते.

VIEW ALL

Read Next Story