केनिया सरकार पुढच्या 10 महिन्यात 10 लाख भारतीय प्रजातीच्या कावळ्यांना मारायचा प्लान करतेय.
पण केनिया सरकार असे का करतेय?
भारतीय कावळे हे विदेशी आहेत, असे केनिया वाईल्डलाइफचे म्हणणे आहे.
हे कावळे तिथे राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास देत आहेत.
1940 च्या आसपास हे कावळे पुर्व आफ्रिकामध्ये पोहोचल्या.
यानंतर तिथल्या कावळ्यांच्या संख्येत वाढ झाली. हे कावळे खूप आक्रमक स्वभावाचे असतात.
या विदेशी कावळ्यांमुळे केनियातील पक्षांची संख्या कमी होऊ लागलीय, असे केनिया सरकारचे म्हणणे आहे.
हे कावळे छोट्या पक्षांची घरटी उडवून लावतात. त्यांची अंडी-पिल्ले खाऊन टाकतात.
हे कावळे पर्यटक आणि हॉटेल इंडस्ट्रीसाठीदेखील त्रासदायक ठरत आहेत.