या ठिकाणी 4 महिन्यांत 3400 महिला बेपत्ता! स्थानिकांमध्ये दहशत

सरकार आणि पोलिसही या प्रकरणांकडे लक्ष देत नसल्याचा स्थानिकांचा दावा

Swapnil Ghangale
Jun 12,2023

बेपत्ता महिला सापडतच नाहीत

अचानक ओळखीतील एखादी महिला किंवा तरुणी बेपत्ता होणं आणि बऱ्याचदा शोधूनही तिचा पत्ता न लागणं हे फारच धक्कादायक असतं.

घटनांचं प्रमाण वाढलं

मात्र हरवलेले लोक सापडण्याऐवजी हळूहळू या घटनांचं प्रमाण वाढणं जातं अन् कोणीही यासंदर्भात कोणतीच कारवाई न करत हा सारा घटनाक्रम एखाद्या चित्रपटामधील वाटतो. मात्र खरोखरच असा प्रकार घडत आहे.

कुठे घडत आहेत हे प्रकार?

दक्षिण अमेरिका खंडातील पेरुमध्ये हा सारा प्रकार घडत आहे. मागील अनेक वर्षांपासून या घटना घडत आहेत.

दिवसोंदिवस महिला हरवण्याचं प्रमाण वाढलं

अनेकांनी हरवलेल्या महिलांना शोधण्यासंदर्भातील आव्हानं करुनही या महिला सापडल्या तर नाहीतच पण दिवसोंदिवस महिला हरवण्याचं प्रमाण वाढत असल्याचं दिसतंय.

4 महिन्यांमध्ये 3400 महिला बेपत्ता

पेरुमध्ये मागील 4 महिन्यांमध्ये 3400 महिला बेपत्ता झाल्या आहेत असं 'द स्ट्रेट टाइम्स'च्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

वॉट हॅपण्ड टू देम?

पेरुमधील लोकपाल कार्यालयाने शनिवारी ही माहिती जारी केली. 'वॉट हॅपण्ड टू देम?' नावाने हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. म्हणजेच त्या महिलांबरोबर काय झालं असं या अहवालाचं टायटल आहे.

1504 महिला अद्यापही बेपत्ता

2023 च्या सुरुवातीच्या 4 महिन्यांमध्ये महिला बेपत्ता झाल्याच्या एकूण 3406 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी 1902 महिला सापडल्या असून 1504 महिला अद्यापही बेपत्ता आहेत.

बेपत्ता झालेल्यांमध्ये तरुणींची संख्या अधिक

2022 मध्ये याच देशात 5380 महिला बेपत्ता झालेल्या. यापैकी अनेकजणी या तरुणी आहेत. हा आकडा 2021 च्या तुलनेत कमी आहे.

ही चिंतेची बाब

उपलोकायुक्त इसाबेल ऑर्टिज यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना, बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं आहे.

घटना थांबवण्याचे प्रयत्न अपुरे

"सरकार अशा घटना रोखण्यासाठी कोणतीही कारवाई करत असल्याचं दिसत नाही," असं इसाबेल यांनी म्हटलं आहे. पेरुची लोकसंख्या 3.3 कोटी इतकी आहे.

सरकारचा बेजबाबदारपणा

"सरकाराच्या लेखी बेपत्ता माहिला हा प्राधान्य क्रमाने हाताळण्याचा विषय नाहीय," अशी टीका इसाबेल यांनी केली आहे.

पोलिस तपास करत नाहीत

अनेक प्रकरणांमध्ये पोलिस सखोल आणि पुरेसा तपास करत नाहीत असा आरोप सेवाभावी संस्था करतात. या महिला स्वइच्छेनं पळून गेल्याचा दावा करत फार तपास केला जात नाही असं सांगितलं जातं.

VIEW ALL

Read Next Story