सॅम वॉल्टन यांनी रिटेलला वॉलमार्टमध्ये बदलून दाखवलं. दैनंदिन जिवनाच्या वस्तू तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध करुन दिल्या. अर्कान्सस येथून छोट्या दुकानातून त्यांनी सुरुवात केली.
धीरुभाई अंबानी उद्योग करण्यासाठी ऐन तारुण्यात घर सोडून बाहेर पडले. हाती काहीच नसताना त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली. केमिकल, टेलिकम्युनिकेश, रिटेल असे मोठे व्यवसाय केले.
राल्फ लॉरेन यांनी फॅशन इंडस्ट्रीत खळबळ माजवली. त्यांचा पोलो ब्रॅण्ड अमेरिकेला रिप्रेझेंट करतो.
स्टारबक्स ही हावर्ड स्क्लूल्ड्झ यांच्या डोक्यातून आलेली कल्पना. छोट्याश्या कॉफीत दडलेली मोठी संधी त्यांनी हेरली आणि मोठा व्यवसाय उभारला.
युक्रेनच्या जॅन कोम यांनी मित्रासोबत मिळून व्हॉट्सअॅपची निर्मिती केली. काही काळाने त्यांनी मोठ्या किंमतीत त्याची फेसबुकला विक्री केली.
डू वॉन चॅंग आणि त्यांच्या पत्नीने मिळून फॅशनमधील मोठं विश्व निर्माण केलं. परवडणारे आणि ड्रेंडी कपडे उपलब्ध करुन दिले.
पालक गमावल्याने रोमन अब्रामोव्हिच यांना सुरुवातीला अडचणी आल्या. पण परिस्थितीवर मात करत ते सध्या ऑईल इंडस्ट्रीतील अब्जोधिश आहेत. तसेच चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक आहेत.
ओप्राह विनफ्रे यांचे सुरुवातीचे शिक्षण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत झाले. पण आपल्या भारदस्त आवाज आणि कौशल्यामुळे त्या मीडिया जगतातील नावाजलेल्या व्यक्ती बनल्या.