शास्त्रज्ञांनी केली मोठी भविष्यवाणी!
आपल्या ग्रहाच्या जवळ आणखी एक पृथ्वीसारखे ठिकाण असू शकतं. जपानी खगोलशास्त्रज्ञांनी मोठा खुलासा केला आहे
कुइपर बेल्ट हा नेपच्यूनच्या बाहेरील एक प्रदेश आहे जो सूर्यमालेभोवती आहे. त्याठिकाणी पृथ्वीसारखा ग्रह असल्याचं सांगितलं जातंय.
हा ग्रह पृथ्वीपेक्षा 3 पट मोठा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तो इतका थंड असेल की जीवसृष्टी अस्तित्वात नाही, असं मत देखील त्यांनी नोंदवलंय.
आम्ही पृथ्वीसारख्या ग्रहाच्या अस्तित्वाची भविष्यवाणी करतो, असं द अॅस्ट्रॉनॉमिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या पेपरमध्ये ताकाशी इटो यांनी म्हटलं आहे.
नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे कुइपर बेल्टचं अस्तित्व आहे. ट्रान्स-नेपच्युनियन वस्तूंच्या कक्षा बाह्य सौर मंडळात न सापडलेल्या ग्रहांचं अस्तित्व दर्शवू शकतात, असंही या पेपरमध्ये सांगण्यात आलंय.
क्विपर बेल्ट ग्रहाच्या अस्तित्वाची सिद्धता करण्याऐवजी ते फक्त भाकीत करू शकतात, असंही ताकाशी इटो म्हणतात.
प्लॅनेट नाईनचा प्रथम 2014 मध्ये कॅलटेकच्या तज्ञांनी सिद्धांत मांडला होता. आजपर्यंत, खगोलशास्त्रज्ञांकडे प्लॅनेट नाईनच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा नाही.