हे प्राणी नामशेष होऊ नये म्हणून वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संस्था प्रयत्न करत आहेत.
संपूर्ण शरीराचा विचार केल्यास तोंड हे एखाद्या हातोडीप्रमाणे वाटत असल्याने हॅमरहेड नाव पडलेली ही शार्क नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या शार्कच्या दोन प्रजाती नामशेष होण्याची शक्यता आहे.
कुत्र्यांची ही प्रजाती सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आफ्रिकन हत्ती हे आशियामधील हत्तींहून वेगळे असतात. हे आकाराने मोठे असतात. त्यांचे कान सुपासारखे मोठे असतात. ही प्रजातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
आपल्या सुंदर रंगासाठी ओळखलं जाणारं हॉक्सबिल कासवही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे कासव जगभरामध्ये त्याच्या सौंदर्यासाठी ओळखलं जातं.
हा एक शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी दक्षिण आशियामधील इंडोनेशिया देशामध्ये आढळून येतो. माकड प्रजातीमधील हा प्राणी नामशेष होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
जगातील सर्वात छोट्या आकाराचा वाघ अशी ओळख असलेली वाघाची ही प्रजाती इंडोनेशियामधील एका बेटावर आढळते.
ही प्रजाती म्हणजे इस्टर्न गोरिलाची उपप्रजाती आहे. या प्रजातीचं वैज्ञानिक नावं गिरला बोरिंगेई असं असून ही नामशेष होत असलेल्या प्रजातींपैकी एक आहे.
पूर्व आशियामध्ये सापडणाऱ्या या गेंड्याची प्रजाती हळूहळू नामशेष होत आहे.
इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (IUCN) रेड लिस्टमध्ये अमूर बिबट्याचा समावेश आहे. हा बिबट्या आशियामधील समुद्रकिनाऱ्या जवळच्या जंगलांमध्ये आढळतो.
भविष्यामध्ये पृथ्वीवरील प्राण्यांच्या काही प्रजाती कायमच्या नामशेष होणार आहेत. या प्रजाती कोणत्या आहेत पाहूयात...