भारतामध्ये नोकरदार वर्गाकडून अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो.
मात्र एकीकडे भारत आयकर आकारत असताना जगातील काही देशांमध्ये आयकर आकारलाच जात नाही. असे एकूण सात देश आहे जिथे आयकर 0 टक्के आहेत. जाणून घेऊयात अशाच देशांबद्दल...
जगातील सर्वात वेगाने विकास करणाऱ्या देशांमध्ये युएईचा क्रमांक लागतो. हा देश येथील नागरिकांकडून आयकर आकारत नाही. मात्र वस्तूंवर अबकारी कर आकारला जातो.
अमेरिका खंडजवळील बेटवजा देशात आयकर आकरला जात नाही. या ठिकाणी घरं फारच सुंदर असून येथे जगभरातील लोक पर्यटनाबरोबरच कायमचे स्थायिक होण्यासाठी येतात.
आखाती देशांपैकी सर्वात महत्त्वाच्या देशांपैकी एक असलेला कतार हा आयकरमुक्त देश आहे. या देशातील नागरिकांकडून वैयक्तिक स्तरावर कर आकारला जात नाही.
व्हानुआतू हा एक छोटा द्वीप-देश असून हा सुद्धा टॅक्स हेवन मानला जाणारा देश आहे. येथील लोकांना आयकर भरावा लागत नाही.
मध्य आशियामधील आयकरमुक्त देश म्हणून बहरीनलाही ओळखलं जातं. या देशात कोणत्याही व्यक्तीला आयकर भरावा लागत नाही.
भारताबरोबरच्या वादामुळे सध्या चर्चेत असलेला आणि पर्यटनावर अर्थव्यवस्था आधारित असलेल्या मालदीवमध्येही आयकर आकारला जात नाही.
समुद्री चाच्यांमुळे चर्चेत असलेला सोमालीया हा देश आयकरमुक्त देश आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.