अमेरिकेमधील टेक्सासमध्ये एका विचित्र घटनेत एका महिलेने उबर चालकावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...

Swapnil Ghangale
Jun 26,2023

गोळी झाडून केलं ठार

उबर चालक आपलं अपहरण करुन शेजारच्या देशात घेऊन जात असल्याची शंका आल्याने या महिलेने ड्रायव्हरवर गोळी झाडून त्याला ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेला धोका नव्हता

पोलिसांनी उबर चालक हा सामान्यपणे ठरलेल्या मार्गानेच या महिलेला नेत होता असं सांगतानाच या महिलेच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता असं स्पष्ट केलं आहे.


फोबी कोपस असं आरोपी महिलेचं नाव असून तिला अटक करण्यात आल्याची माहिती टेक्सासमधील एल पासो येथील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आधी लाइफ सपोर्टनंतर मृत्यू

डॅनियल गार्सिया असं मृत्यू झालेल्या 52 वर्षीय चालकाचं नाव आहे. त्याला लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं. मात्र तो वाचण्याची शक्यता कमी असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर त्याला लाइफ सपोर्टवरुन काढलं आहे. डॅनियलचा मृत्यू झाला आहे.

16 जूनपासून तुरुंगामध्ये

फोबी कोपस ही 16 जूनपासून तुरुंगामध्ये आहे. फोबी कोपस ही मूळची केंटुकी येथील रहिवाशी आहे. ज्या दिवशी फोबी कोपसने या चालकाची हत्या केली त्याच दिवशी तिला अटक करण्यात आली.

एका साईन बोर्डने घाबरली

फोबी ही तिच्या बॉयफ्रेण्डला भेटण्यासाठी टेक्सासला आली होती. ती उबरने प्रवास करत असतानाच तिला मॅक्सिको असं लिहिलेला माईलस्टोन दिसला. एल पासो हे शहर अमेरिका आणि मॅक्सिकोच्या बॉर्डरजवळ आहे.

...अन् गाडी थांबली

हा बोर्ड पाहून आपलं अपहरण करुन मॅक्सिकोला नेण्याचा चालकाचा कट असल्याचं फोबीला वाटलं. तिने या चालकावर गोळी चालवली असता दोघेही बसलेली निसार मॅक्सिमा हायवेच्या कठड्याला ठोकून थांबली.

नंतर पोलिसांना कळवलं

फोबीने भीती वाटल्यानंतर कोणाचाही मदत मागण्याऐवजी थेट चालकावर गोळी चालवली आणि त्यानंतर जखमी चालकाचा फोटो आपल्या प्रियकराला पाठवला. त्यानंतर तिने पोलिसांना याबद्दल कळवलं.

घरात कमवणारा एकमेव व्यक्ती

डॅनियलची पत्नी अॅना हिने 'गोफाऊंडमी'ला दिलेल्या माहितीनुसार डॅनियल हा घरात कमवणारा एकमेव व्यक्ती होता. मागील नोकरीमध्ये गुडघ्याला दुखापत झाल्याने पुन्हा उबरमध्ये काम करुन पैसे कमवता येत असल्याने डॅनियल फार समाधानी होता.

कष्ट करुन कुटुंबासाठी पैसे कमवत होते

डॅनियलच्या पुतणीने, "आपणच आपला विचार करुन एखाद्याला वाईट ठरवं फार सोप आहे. मात्र ते गुन्हेगार नव्हते. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेराची नव्हती. ते फार कष्ट करुन कुटुंबासाठी पैसे कमवत होते," असं म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story